रविवार, २४ मे, २०२०

सायबर सुरक्षा : आजची गरज

                                           

आज कोरोनामुळे संपूर्ण जगात हाहा:कार माजला आहे. लॉकडाऊन मुळे अर्थव्यवस्थे बरोबर सर्वच क्षेत्रांवर प्रचंड ताण आला आहेअशा परिस्थितीत खूप मोठा त्याग करून दानशूर व्यक्तींनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मोठमोठ्या देणग्या देऊन, गोरगरिबांना आपापल्या कुवती प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली.  या सर्वांचे कौतुक, अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.                                  

  दुर्दैवाने आजच्या या महामारीच्या काळाचा गैरफायदा घेणारे लोक ही काही कमी नाहीत. ‘मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा' प्रकारही या संकट काळात आपणास पाहायला मिळतो आहे.  वस्तूंचे भाव वाढवणे, सॅनीटायझर मध्ये काळाबाजार करणे, खाजगी डॉक्टरनी कोरोनाची फारशी लक्षणे नसतानाही रुग्णाला कोरोना चाचणी करायला लावणे अशा कितीतरी छोट्या-मोठ्या गोष्टी या काळात पहावयास मिळाल्या.  लोकांकडे पैसा नसल्याने, उत्पन्नाची साधने बंद झाल्याने चोऱ्यामाऱ्या, फसवणूक, लुबाडणूक या गोष्टी येत्या काळात वाढणार आहेत असा तज्ञांचा अंदाज आहे.

याचाच एक भाग म्हणजे सायबर गुन्हेगारी. या लॉकडाऊन च्या काळात बरेचसे व्यवहार हे ऑनलाइन करण्यात आले. इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला गेला.  त्याच्या बरोबरीनेच सायबर गुन्हेगारी ही प्रचंड वाढली. आपला देश चीन नंतरचा सर्वात जास्त इंटरनेट वापरणारा देश आहे.  अगदी खेड्यापाड्यात इंटरनेट पोहोचते आहे. हळूहळू त्याचा वापर वाढतो आहे; परंतु इथे प्रश्न निर्माण होतो तो वापराच्या प्रशिक्षणाचा.  कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना आपण काय दक्षता घ्यायला हवी?  हे सर्वप्रथम समजून घेण्याची खरी गरज आहे, अन्यथा आपली फसवणूक होणे अटळ आहे.

नोकरीवरून काढण्याच्या रागातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल द्वारे त्रास देणे, एकतर्फी प्रेमातून तरुणीने नकार दिला म्हणून तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी करणे, फेसबुक प्रोफाईल हॅक करून खंडणी मागणे अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.  या गुन्ह्यांचा विचार करता, सोशल मीडियाच्या वापराची पुरेशी माहिती नसल्याने असे गुन्हे वाढत आहेत हे दिसते. या गोष्टी अनेक अनर्थ व संकटे उभी करू शकतात. माहिती हॅक करून ती विकली जाऊ शकते.  त्याचा गैरवापर होऊ शकतो.  चॅटिंग च्या माध्यमातून आपला आय.डी, पासवर्ड हॅक होऊ शकतो. व्हायरस डाऊनलोड साठी पाठवून आपल्या संगणकावरील सर्व माहिती, बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड चोरले जाऊ शकतात. ट्रोजन सारख्या वायरस द्वारे जगातून कुठूनही कोणत्याही संगणकावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे.


आज संगणकावरील आपली माहिती सुरक्षित ठेवणे हे फार मोठे आव्हान आहे. रेनसमवेअर, मालवेअर या व्हायरसच्या माध्यमातून संगणक सिस्टीम वर हल्ला केला जाऊ शकतो, फाईल खराब केल्या जाऊ शकतात. फिशिंग सारख्या प्रकारातून आपणास खोटे मेसेज येऊ शकतात.  त्याला आपण उत्तर दिले तर आपला महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो.  सोशल इंजिनियर सारख्या प्रकारातून आपला डेटा, पासवर्ड इ. गोष्टींची चोरी केली जाऊ शकते. अशा कितीतरी प्रकारे आपली फसवणूक होऊ शकते.  यासाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. याच्या मदतीने आपण आपला मौल्यवान डेटा सुरक्षित ठेवू शकतो तसेच चोरी होण्यापासून किंवा चोरीच्या धमकी पासून आपण स्वतःला वाचवू शकतो. त्यासाठी चांगल्या दर्जाचे अँटिव्हायरस आपल्या संगणकात असणे आवश्यक आहे. अँटीव्हायरस हे एक सेफगार्ड असते. तुमच्या संगणकातील व्हायरसचा शोध घेऊन ते डिलीट करण्याचे काम करते. मात्र हे अँटीव्हायरस नेहमी अपडेट ठेवणे हेही तितकेच आवश्यक असते.                                                                                        

इंटरनेट वरील उपलब्ध माहिती नुसार या वर्षात केवळ 6 महिन्यांमध्ये 4.3 लाख सायबर हल्ले झाले. हे हल्ले चीन, रूस, अमेरिका या देशांमधून झाले. 73000 हल्ले हे देशांतर्गत होते, एवढेच नव्हे तर आपल्या देशातील सायबर हल्लेखोरांनी विविध देशांवर 36563 एवढे हल्ले केले आहेत.  तज्ज्ञांच्या मतानुसार भारतात सायबर हल्ल्यांना बळी पडणाऱ्यांची संख्या जास्त असू शकते; कारण आपल्याकडे आजही असे हल्ले रोखण्यासाठी मजबूत यंत्रणा नाही, तसेच लोकांमध्ये जागृती नाही.

विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून आपण आपला बचाव करण्यासाठी विविध तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण अंगीकारणे फार आवश्यक वाटते.  त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी खाली देत आहे.

      1.  सोशल मीडियावर कोणतीही वैयक्तिक माहिती, फोटो शेअर करू नये.

      2.  व्हाट्सअॅप च्या डी.पी. ची सेटिंग समजून घेणे आवश्यक आहे.

      3. मुलांच्या इंटरनेट वापरावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

      4. ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय करावेत.

      5. संगणकात चांगल्या प्रकारचा अँटिव्हायरस ठेवावा व तो नियमित अपडेट करावा.

      6. स्पॅम मेल,  फसवे मेल त्यावर डबल क्लिक करू नये.

      7. पासवर्ड स्ट्रॉंग ठेवावा, गोपनीय ठेवावा, तो वेळोवेळी बदलावा.

      8. बँकेचा टोल फ्री नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवावा.

      9. आधार कार्ड च्या वेबसाईटवर जाऊन लाॅक बायोमेट्रिक हा ऑप्शन निवडावा.

      10.कोणतेही ॲप डाऊनलोड करताना Allow बटन दाबण्यापूर्वी वरचा मेसेज काळजीपूर्वक वाचावा.

              विस्तार भयामुळे या सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण देणे शक्य नाही.  माझ्या या लेखातून मी केवळ या विषयाचं गांभीर्य लक्षात आणून देऊ इच्छितो.  वाचकांनी या विषयी अधिक माहिती घेऊन आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. याबाबत स्वतः जागरूक व्हावे व इतरांनाही जागृत करावे.

-------------------------

                                  स्पर्धा कोड   - Hitguj30

सायबर सुरक्षा जागृती स्पर्धे बाबत सूचन

     1.  ही स्पर्धा सोमवार दिनांक २५ मे २०२० ते जून या काळात चालू राहणार आहे. स्पर्धेचा निकाल जून रोजी दुपारी .०० वाजता वेबसाइट वर जाहीर केला जाईल.

     2. पहिल्या बॉक्स मध्ये असणारी लिंक काॅपी करावी आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा काळात कितीही दिवस    कितीही वेळा शेअर करावी त्या लिंक वरून या स्पर्धेसाठी जेवढे स्पर्धक वाढतील त्या प्रत्येक स्पर्धकामागे 10 गुण आपणाला मिळतील.

      3. माझ्या वाचकांसाठी ब्लॉगच्या खाली असणारा कोड स्पर्धा फॉर्म मध्ये   टाईप केल्यास त्यातून तुम्हाला 30 गुण मिळतील.

    4. जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या वाचकाला माझ्या या कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल प्रोत्साहनपर Kaspersky internet security एक वर्षाच्या काळासाठी दिली जाणार आहे.

      5. विजेत्या स्पर्धकास लायसन की आणि डाउनलोड कारण्या विषयीच्या सूचना  -मेल द्वारे पाठवण्यात येतील.

      6.  विजेत्या स्पर्धकाचे नाव दि. जून २०२० रोजी माझ्या वेबसाईट वर प्रसिद्ध केले जाईल.  

                                            स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा

                                                                 https://drrajeshrajam.in

 

 

४ टिप्पण्या: