भारत देश आज
विकसनशील देशांच्या यादीतून विकसित देशांच्या यादीत प्रवेश करायला उत्सुक आहे. त्या दिशेने आपली वाटचालही सुरु आहे. विविध क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातहीआपण मागे नाहीत. इंटरनेटच्या वापरात आपण खूप वरच्या नंबरवरआहोत. आजच्या घडीला सुमारे पाचशे मिलियन लोक आपल्या
देशात इंटरनेट वापरत आहेत. यातच
इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमे (Social Media) तर भारतात खूपच
मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली आहेत. फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, ब्लॉग, व्हाट्सअॅप
यांचा वापर तर दिवसेंदिवस खूपच वाढत चालला आहे. समाज माध्यमांच्या आभासी जगात आजची तरुणाई खूपच
रमताना दिसत आहे.
समाज माध्यमांचा
फायदा हा खूप मोठा आहे. एखादी बातमी
प्रिंट मिडिया कडून मिळण्याच्या कितीतरी आधी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या द्वारा ती
सर्वांपर्यंत पोहोचलेली असते. एखादा संदेश काही क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या
ठिकाणी पोहोचत आहे. या माध्यमातून जाहिरात करणे अत्यंत सोपे झाले
आहे. निवडणूक लढवताना समाज माध्यमांचा सकारात्मक
उपयोग करून घेता येतो हे राजकीय पक्षांनीही आता सिद्ध केले आहे. आपले विचार प्रकट
करण्यासाठी आजच्या पिढीला हे एक फार मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आपल्या
भावना व्यक्त करण्याचं हे खास व्यासपीठ मिळालं आहे. हे जरी खरे असले तरी समाज माध्यमांच्या वापराचे
भान मात्र आपणास असणे फारच आवश्यक आहे. एखादा संदेश लिहिताना किंवा अग्रेषित करताना (forward) फार काळजीपूर्वक तो करावा लागतो. आपल्या
संदेशामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आपणास काळजी घ्यावी लागेल. आपला
देश धर्मनिरपेक्ष असल्याने कोणत्याही धर्मावर टीका करणे टाळले पाहिजे. आपल्या
कोणत्याही संदेशामुळे सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
आपल्या देशात
बऱ्याचदा सायबर गुन्ह्यांबाबत पुरेसा अभ्यास नसल्याने अज्ञानातून अनेक गुन्हे
घडतात. आपण
एखादा संदेश लिहितो किंवा अग्रेषित करतो तेव्हा त्याची सत्यता तपासणी फारच आवश्यक आहे. टी.व्ही.वरील एखादी बातमी सर्वात प्रथम आपल्या चॅनेलने दाखवली असे
सांगताना जशी सर्व चॅनेल्सची चढाओढ असते, तशी एखादा संदेश
प्रथम मी पाठवला यासाठी कोणतीही सत्यता न पडताळता संदेश अग्रेषित करण्याकडे बऱ्याच
जणांचा कल असतो. काही जणांचा तर
व्हाट्सअॅप वरचा संदेश जसाच्या तसा पुढे पाठवणे हा एक छंदच झाला आहेआणि मग
वाचणाऱ्याच्या मनात संदेह निर्माण होतो. यातूनच
‘व्हायरल सत्य' सारखा कार्यक्रम जन्म घेताना दिसतो, कारण ती काळाची
गरज बनते.
काही ठराविक
उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्हाट्सअॅप वर काही ग्रुप तयार करण्यात येतात. हळूहळू त्याचा मुख्य उद्देश बाजूस
पडूनत्याच्यावर गुड मॉर्निंग, गुड नाईट, खाजगी फालतू चॅटिंग सुरू होते. कुणीतरी एखाद्या साठी ‘हॅप्पी बर्थडे' हा मेसेज पाठवतो आणि
मग हळूहळू ग्रुप मधील सर्व सदस्य ते कॉपी-पेस्ट करतात (अगदी चुकीच्या स्पेलिंग सह)
आणि ज्याचा वाढदिवस आहे ती व्यक्ती प्रत्येकाच्या मेसेजला थँक यु ची परतफेड करत
असते. तेवढ्यात आणखी कोणाचातरी वाढदिवस पुढे येतो आणि
पुन्हा हे मेसेज सुरू होतात. एक वेळ
हे खाजगी कौटुंबिक ग्रुप वर ठीक आहे; परंतु विशिष्ट उद्देशाने सुरू झालेल्या
सार्वजनिक ग्रुपवरअसे मेसेज येणे हे चुकीचे वाटते. आश्चर्य म्हणजे
अशा सार्वजनिक ग्रुपवर स्वतःच्या मुलालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे
पालकहीआपणास दिसतात.
जत्रेत जसे हौसे, गवसे, नवसे लोक असतात
तसे ते व्हाट्सअॅप सारख्या समाज माध्यमांवर ही दिसतात. काहींना फक्त प्रसिद्धी हवी असते. काही आपले विचार आवेशाने, अशोभनीय भाषेत मांडत असतात. काहींना केवळ वादविवादात रस असतो. काही दोघांचे वादविवाद सुरू असताना अंगठा दाखवून
किंवा विविध इमोजींचा वापर करून एखाद्याला प्रोत्साहन देत असतात. तर काहींची केवळ बघ्याची भूमिकाही असते. समाजातील विघातक प्रवृत्ती समाज माध्यमांचा
गैरफायदा घेत असतात आणि काही अज्ञानी, बेजबाबदार लोक
ते संदेश अग्रेषित करून त्याला खतपाणी घालत असतात. ज्या
संदेशातून धार्मिक दंगली होतील असे संदेश तयार करणारे गुन्हेगार आहेतच; पण असे
संदेश अग्रेषित करणारे ही तितकेच गुन्हेगार आहेत. संदेश
लिहिताना किंवा पाठविताना जेव्हा आपले भान सुटते तेव्हा सरकारला नियमांचा बडगा
दाखवावा लागतो. कोरोना या जागतिक
महामारीच्या परिस्थितीत सुद्धा याबाबत येणारे टुकार विनोद, अफवा हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. समाज माध्यमांचा वापर करताना आपण योग्य ते भान
ठेवले नाही तर माणसामाणसांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते आणि हे आपल्या
धर्मनिरपेक्ष एकसंघ भारतासाठी अत्यंत घातक आहे.
सर खुप छान
उत्तर द्याहटवामस्त mithra
उत्तर द्याहटवाSuperb
उत्तर द्याहटवावैचारिक अस्तिर परिस्थितीत सामाजिक समतोल राखण्यासाठी उत्कृष्ट विचारमंथन💐
उत्तर द्याहटवाFarach Chan
उत्तर द्याहटवाAbsolutely true Sir! We should be conscious enough while using social media to nurture our integrity.
उत्तर द्याहटवाDr. Hemlata Marathe
उत्तर द्याहटवाSuperb sir its true and real fact....
उत्तर द्याहटवाDear Sir,
उत्तर द्याहटवाThis is fact but unknowingly each and everyone stick to social media .Many of us do not know how to handle it but because of others and competitive feeling use it.Sir,Most of us do not know how the social media used by politics and common people unknowingly grab init because they are emotional and that's why community riotous happened ,so as you we have to use social media very very very carefully .Nice article
Very true
उत्तर द्याहटवाछान लेख आहे
उत्तर द्याहटवाVery good article.Be safe online.
उत्तर द्याहटवाखूप छान मित्रा आणखीन लिखाणासाठी शुभेच्छा तुला
उत्तर द्याहटवाखूप छान मित्रा पुढील लिखाणासाठी शुभेच्छा तुला.
उत्तर द्याहटवाप्रा. श्रीकांत शिरसाठे
पुढचा लेख कधी.
उत्तर द्याहटवाछान विवेचन
उत्तर द्याहटवालेख छान आहे परंतु अपूर्ण वाटतो. मला वाटते की यामध्ये काही उदाहरण असायला हवी होती व लोकांनी यामध्ये स्वतः कसे वाहून जाऊ नये याबद्दलही उहापोह करावयास हवा होता. धन्यवाद !
उत्तर द्याहटवालेख छान आहे परंतु अपूर्ण वाटतो. मला वाटते की यामध्ये काही उदाहरण असायला हवी होती व लोकांनी यामध्ये स्वतः कसे वाहून जाऊ नये याबद्दलही उहापोह करावयास हवा होता. धन्यवाद !
उत्तर द्याहटवाNice Sir
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवाया लॉकडाउनच्या काळात आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांपर्यंत पोहोचत आहे याचाच मोठा आनंद होत आहे
उत्तर द्याहटवा