पाटीवर वळणदार ‘गमभन’
लिहून आमच्या पिढीच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. हळूहळू
त्यात बदल होत होत पुढच्या पायऱ्या सुरू झाल्या. ब्लॅक बोर्ड, ग्रीन बोर्ड, व्हाईट बोर्ड, एल.सी.डी प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड अशी काही साधने पुढे पुढे बघायला मिळाली. आजची कोरोना
पार्श्वभूमीची परिस्थिती पाहता, शिक्षण
क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची वेळ आली की काय? असा प्रश्न मनात येतो. अगदी
या परिस्थितीमुळे आज परीक्षाही रद्द करण्याची वेळ आली. या पास
होणाऱ्या बॅचला पुढे कदाचित ‘कोरोना बॅच' असेही ही नाव ठेवले जाईल. कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार हे
निश्चित झाले. त्यात शिक्षण क्षेत्राचे काय होणार? हा शिक्षण तज्ज्ञांबरोबरच
सामान्य विद्यार्थ्यालाही पडलेला प्रश्न आहे.
शिक्षण
क्षेत्राबाबत जे विविध तर्कवितर्क केले जात आहेत त्यात चर्चा आहे ती ऑनलाईन
शिक्षणाची. ई-लर्निंग, ब्लेंडेड लर्निंग, रिमोट लर्निंग यांचीही चर्चा झाली. फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने यासारखा उत्तम उपाय दुसरा
असूच शकत नाही यात संदेह नाही; परंतु आज आपल्या देशाच्या परिस्थितीचाही विचार
करण्याची गरज निर्माण झाली आहे. सुमारे ७० टक्के लोक आज खेड्यात राहतात. खेडेगावात पुरेशा सुविधा आजही पोहोचलेल्या नाहीत. मुख्य म्हणजे
ऑनलाईन शिक्षणासाठी वीज आणि इंटरनेट या दोन गोष्टी ग्रामीण भागात पोहोचल्या आहेत
का? पोहोचल्या असतील तर त्यांची स्थिती काय आहे? त्या किती सक्षम आहेत? किती टक्के विद्यार्थ्यांकडे संगणक आहे?, इंटरनेटची व्यवस्था आहे?, किती टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे?, किती टक्के विद्यार्थ्यांकडे टी.व्ही., रेडिओ आहे? याचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक साधनांचा डोळ्यांना होणारा त्रास, सखोल वाचनाची सवय कमी होण्याची शक्यता, शिक्षकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न हे धोकेही या
ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील.
भारत हा बहुभाषिक
देश आहे. मातृभाषेतून शिक्षण कधीही चांगले, हे भाषा तज्ज्ञ
सांगतात, मग हे ई-लर्निंग, ऑनलाइन शिक्षण
मातृभाषेतून दिले जाणार का? असेही प्रश्न निर्माण होतात. दुसऱ्या बाजूने
विचार करता ऑनलाईन शिक्षणाचे फायदेही भरपूर आहेत. विद्यार्थ्यांना एका वेगळ्या अनुभवाची प्रचिती
येथे येऊ शकते. वेगवेगळ्या ऑडिओ- व्हिडिओंच्या माध्यमातून निरनिराळ्या कृती, रंजक उदाहरणांतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू
शकते; पण त्यासाठी काही महागडी साधने उपलब्ध असणे आवश्यक आहे. अशा
काही साधनांची उपलब्धता जरी सरकारी पातळीवरून किंवा दानशूर व्यक्तींकडून केली गेली
तरी पुढचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्याच्या वापराचा, प्रशिक्षणाचा.
नवीन तंत्रज्ञान
स्वीकारणे सहज शक्य नसते. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे तर, लाॅकडाऊनच्या काळात अनेक वेबिनार्स झाले, त्यावेळी त्याची प्रचिती आली. अगदी वक्त्यांनाही आपला माईक कसा धरावा?, कसे बसावे?, कोठे बसावे? हे
माहीत नव्हते. सहभागी लोकांपैकी काहीजण आपला व्हिडिओ प्रसारित
होत आहे हे कदाचित माहित नसल्याने बनियनवर बसलेले पहायला मिळाले. स्वतःला म्यूट कसे करायचे? हे माहीत नसल्याने घरातला सर्व गोंधळ त्या वेबिनार्स
मध्ये व्यत्यय आणत होता. चॅट बॉक्सचा (वेबिनार
सुरू असतानाच) गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून
आणि सर्टिफिकेट मिळवण्यासाठी केलेली फीडबॅक लिंकची मागणी असा केलेला वापर हे सर्व
पाहिल्यावर प्रशिक्षणाची गरज अधोरेखित झाली.
ऑनलाइन
शिक्षणासाठी अभ्यासक्रम हा भारताचा विचार करून केला गेला पाहिजे. सर्वप्रथम शिक्षक प्रशिक्षण आणि तेही त्यांच्या
मातृभाषेत देणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. डी.एड., बी.एड.च्या अभ्यासक्रमांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापराचा समावेश
केला पाहिजे. ज्या शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
करून शिकवणे थोडेसे कठीण वाटत असेल त्यांनी आजच्या परिस्थितीनुरूप, सकारात्मकतेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, नाहीतरी भविष्यात हे आपणाला करावे लागणारच आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिले जावे केवळ
इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्याचे शिक्षण देऊन चालणार नाही, तर ती सुरक्षितपणे कशी वापरावीत हे ही शिकवले गेले पाहिजे. सायबर
क्राईमचाही अभ्यास त्यात असावा. इंटलेक्च्युअल प्राॅपर्टी राईटचेही शिक्षण दिले
गेले पाहिजे. फेक वेबसाईट कशा ओळखाव्यात? ॲप्स डाऊनलोड
करतानाची काळजी हेही शिकवले गेले पाहिजे. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुले मोबाईल गेम
खेळणार नाहीत ना? यावरही पालकांनी नजर ठेवणे आवश्यक ठरेल. ऑनलाइन कोर्सेस करताना परदेशी कोर्सेस कडे
विद्यार्थ्यांचा कल जास्त असेल, मग त्यातून
फसवणूक तर होणार नाही ना? याचीही काळजी घ्यावी लागेल. अभ्यासक्रमांमध्ये या प्रशिक्षणाचा समावेश केला
पाहिजे. उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची निवड झाल्यावर
त्यांना लगेचच अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची सक्ती करणे आवश्यक आहे. तर या
वापराची समस्या काही अंशी कमी होईल.
सध्याची
परिस्थिती जरी कठीण असली तरी पारंपरिक शिक्षण पद्धत आता लयाला जाणार असे होणार
नाही; कारण क्लासरूम टिचींग ची जागा इतर कोणती पद्धत घेणार नाही यात शंकाच नाही. त्यामुळे आजच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संशोधकांनी, शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी पुढे येण्याची गरज आहे. पाचव्या लॉक डाऊनला
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘पुनश्च हरिओम', ‘ही एक नवीन सुरुवात आहे' असे म्हटले आहे. त्यादृष्टीने शिक्षणाच्या बाबतीतही आपल्याला
काही नवीन प्रयोग करावे लागतील, नवीन सुरुवात करावी लागेल. सरकारने आज अशा
प्रकारच्या संशोधनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. कोणत्याही समस्येला उत्तर हे असतेच, हे उत्तर आपणाला लवकरात लवकर व आपल्या देशाच्या परिस्थितीचा
पूर्ण विचार करून मिळवायचे आहे.
विद्यार्थ्यांनी
मात्र कोणत्याही परिस्थितीत या समस्येला सामोरं गेलं पाहिजे. परिस्थितीशी सामना करणारा मोठा होतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. या
सर्व बदलांना संधी मानली पाहिजे. कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी
योग्य शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो अशा शिक्षणक्रमाची निवड केली
पाहिजे. नुकतेच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर
भारत' अशी जी घोषणा केली त्यादृष्टीनेही हे महत्त्वाचे ठरेल. जगाची आजची
मागणी काय आहे? याचा नीट दूरदृष्टीने
विचार केला पाहिजे. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात पारंपरिक शिक्षण
घेण्याचीही परिस्थिती नव्हती 4-5 किलोमीटर पायी
चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते. गरिबीमुळे कित्येकांना शाळा सोडावी लागत होती. अशा
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही त्यांना त्याचे
फळही मिळाले. त्यामुळे शिक्षण कोणत्याही प्रकारचे दिले गेले, कोणत्याही साधनांतून, माध्यमांतून दिले गेले, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्या सर्व वातावरणाशी
जुळवून घेऊन शिक्षण घेतले पाहिजे, एवढे मात्र
नक्की.
-------------------------------------------------------------------------------------------------वाचकहो !
सर्वप्रथम आपण माझ्या लेखनासाठी जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हा ब्लॉग वाचून आपणाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही खालील टॅबवर क्लीक करून माझ्या
"उत्कृष्ट वाचक प्रतिक्रिया स्पर्धेत" सहभागी होऊ शकता.
· स्पर्धकांसाठी सूचना -
1. कॉमेन्टबॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया लिहा आणि त्याखाली आपले नाव लिहून ई-मेल आय.डी. लिहा. आणि PUBLISH टॅब वर क्लिक करा.
2. नाव न लिहिल्यास त्या प्रतिक्रियेचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.
3. आपली प्रतिक्रिया १०० पेक्षा कमी शब्दांमध्ये लिहावी.
4. उत्कृष्ट प्रतिक्रियेसाठी आपणास अमेझॉन गिफ्ट कार्ड मिळेल.
5. स्पर्धेचा निकाल https://drrajeshrajam.in या वेबसाईट वर आपणास सोमवार दिनांक १५ जून २०२० रोजी पाहता येईल.
Very true
उत्तर द्याहटवाSUDHAKAR VITTHALRAO MASKE
उत्तर द्याहटवाचर्चा ऑनलाईन शिक्षणाची हा लेख खरंच खुप छान संदेश आहे व ऑनलाइन शिक्षणाबद्दल जागृतीची अत्यंत आवश्यकता आहे असे मला वाटते,काळानुसार बदल आवश्यक आहे पण जुने तंत्रज्ञान सुद्धा आवश्यक असते.
खूप छान. अत्यंत मोजक्या शब्दांत ऑनलाईन शिक्षणाविषयी आपण परखड मत मांडले आहे. एकंदरीत या नव्या अध्ययन-अध्यापन पद्धतींचे आपण स्वागत करता पण धोकेही दुर्लक्षुन चालणार नाही हे प्रकर्षाने मांडता. हे आपल्या विचारांचे नाविन्य सद्यकाळात मार्गदर्शक ठरणारे आहे.
उत्तर द्याहटवाश्री. गिरीश रघुनाथ गोसावी
ggirish4818@gmail.com
'चर्चा ऑनलाईन शिक्षणाची'लेख वाचून खूपच अंतर्मुख झाले. माझेच अव्यक्त विचार शब्दांकित केले की काय ? असे वाटले.
उत्तर द्याहटवान भूतो .. अशी स्थिती असताना, संपूर्ण जग कोवीड-19 संघर्षाला सामोरे जात आहे.कोणतीच निश्चितता नसताना शिक्षणव्यवस्थेची तारांबळ दिसून येत आहे . यातूनच शिक्षण क्षेत्रात आलेला नवा विचार,प्रवाह म्हणजे ऑनलाईन शिक्षण .
भारताची सद्यस्थिती व ऑनलाईन शिक्षण कितपत योग्य व शक्य आहे ? त्याची गरज, मर्यादा, त्रुटी पाहता , यावरचे आपले विचार चिंतन करायला लावणारे आहेत .आपला हा लेख शिक्षण क्षेत्रात एक नवा विचार देणारा , विचार करायला लावणारा मार्गदर्शक आहे . आज या समाजाला परखड विचार मांडणारे , योग्य दिशा देणारे आपल्या सारखे मार्गदर्शक गरजेचे आहेत .
श्रीम . कविता लक्ष्मण कांदळगावकर
ggaurigeet@gmail.com
लेख उत्तम आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तीच परिस्थिती ऑनलाइन शिक्षणाचीही आहे.काही फायदे तर काही तोटेही असणारच पण त्याच्या योग्य वापराचे शिक्षण हे सर्वांनी घेतलेच पाहिजे आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब तुम्ही तुमच्या लेखनातून समाजासमोर आणली त्याबद्दल धन्यवाद. असेच उत्तमोत्तम लेख लिहून जनजागृती करत रहा.
उत्तर द्याहटवाआदिती आरोंदेकर
a.aditi@gmail.com
खुप सुंदर लेख.आपन छान माहीती दिलात सर आजचे आधूनीक युग हे इंटरनेट चे आहे. याचा योग्य वापर करने गरजचे आहे.मुलांना शिक्षना सोबत नविन तंत्रज्ञानामधे भरच पडत आहे हल्ली मुल मोबाइल मधे पारंगत आहेत.यामुळे नक्की ते आवडीने स्विकार करतील .
उत्तर द्याहटवा_ अजित माने
ajitswapnapurti@gmail
आपण भारतीयांना तहान लागली की विहीर खणायची
उत्तर द्याहटवासवय झाली आहे. बऱ्या च ZPच्या शाळांमध्ये संगणक पोहचले पण NET नाही. अशा ठिकाणी ऑनलाईन शिक्षण कसे पोहचेल. ग्रामीण भागात मोबाईल सेवा BSNL देत जे 2 दिवस चालू असले की आठ दिवस बंद.भारतातील भागातील पायाभूत सुविधांचा अभाव आणि आधुनिकीरणासाठी हट्ट .. हे सगळं समीकरण जुळायला थोडा वेळ लागेल...
.
.
पण सर तुम्ही म्हणता ते ही बरोबर आहे अनेक शिक्षक या नवीन पद्धती शिकण्यासाठी धडपड करत आहेत. बरेच ग्रामीण पार्श्वभूमी चे आहेत अनेक पुढच्या वर्षी निवृत्त होणारे आहेत.. त्यांना webinar प्रकार हे पहिल्यांदाच समा आहे.. पण तरी ते त्यात भाग घेऊन नवीन गोष्टी शिकत आहे हे खरं खरं कौतुकच आहे..
तुम्ही या नवीन शिक्षणपद्धतीची दोन्ही बाजू उत्तम प्रकारे मंडळी.... आपल्याकडे उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या सोई सुविधाच्या आधारे आपल्याला नवीन स्वीकारलं पाहिजे आता आपण हे स्वीकारलं तर पुढे अजून sakaratmस बदल होईल.... हे नक्की.. आणि अगदी बरोबर सर शिक्षक क्लासारcl lerninle याची जागा जगातील कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही १००%.
राहुल पवार
आपण भारतीयांना तहान लागली की विहीर खणायची
उत्तर द्याहटवासवय झाली आहे. बऱ्या च ZPच्या शाळांमध्ये संगणक पोहचले पण NET नाही. अशा ठिकाणी ऑनलाईन शिक्षण कसे पोहचेल. ग्रामीण भागात मोबाईल सेवा BSNL देत जे 2 दिवस चालू असले की आठ दिवस बंद.भारतातील भागातील पायाभूत सुविधांचा अभाव आणि आधुनिकीरणासाठी हट्ट .. हे सगळं समीकरण जुळायला थोडा वेळ लागेल...
.
.
पण सर तुम्ही म्हणता ते ही बरोबर आहे अनेक शिक्षक या नवीन पद्धती शिकण्यासाठी धडपड करत आहेत. बरेच ग्रामीण पार्श्वभूमी चे आहेत अनेक पुढच्या वर्षी निवृत्त होणारे आहेत.. त्यांना webinar प्रकार हे पहिल्यांदाच समा आहे.. पण तरी ते त्यात भाग घेऊन नवीन गोष्टी शिकत आहे हे खरं खरं कौतुकच आहे..
तुम्ही या नवीन शिक्षणपद्धतीची दोन्ही बाजू उत्तम प्रकारे मंडळी.... आपल्याकडे उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या सोई सुविधाच्या आधारे आपल्याला नवीन स्वीकारलं पाहिजे आता आपण हे स्वीकारलं तर पुढे अजून sakaratmस बदल होईल.... हे नक्की.. आणि अगदी बरोबर सर शिक्षक क्लासारcl lerninle याची जागा जगातील कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही १००%.
राहुल पवार
आपण सगळेच या ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेतून जात आहोत,पर्याय नाही म्हणून सुरू झालेलं के शिक्षण कदाचित पुढील काळाची एक झलक आहे.एक नवीन युगाची सुरुवात आहे असं समजायला हरकत नाही.संकटातून निर्माण झालेल्या चांगल्या संधींपैकी ही एक आहे.यातून नवीन संकल्पना शिक्षणाच्या समोर येणार आहे हे नक्की.तुझे विचार तू ठाम पणे मांडले आहेस.मस्त👌👌असाच व्यक्त होत राहा.
उत्तर द्याहटवामी माझी प्रतिक्रिया वर दिली आहे वर ई-मेल वर क्लीक केलं पण नाव येत नाहीये
हटवामृणाल केळकर