टिकायचं तर शिकायचं
आज जगभरात तंत्रज्ञानाचा प्रचंड विकास होताना दिसत आहे. मानवी जीवन सुकर होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचे शोध लागत आहेत आणि वापरही होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, आज नवीन वाटणारे तंत्रज्ञान उद्या जुने होताना पाहायला मिळते. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI ) खूप मोठा प्रभाव अनेक क्षेत्रांवर होताना दिसत आहे. या तंत्रज्ञानामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये क्रांती होत आहे, त्यामुळे अनेक नोकऱ्यांवर गदा येऊ लागली आहे. ( AI बद्दल यापूर्वी मी माझ्या ३१ जुलै २०२३ च्या ब्लॉग मधून सविस्तर मांडणी केली आहेच) माणसाचे काम जर मशीन कडून अधिक अचूक व अत्यंत वेगवान होणार असेल तर माणसाची गरजच काय? हा प्रश्न आहे.
म्हणूनच आज प्रत्येकासमोरचा मुख्य प्रश्न आहे तो टिकण्याचा. आय.टी. किंवा संगणक शास्त्र यासारख्या क्षेत्रांनाच याची झळ बसेल असे आपणास वाटत असेल तर ते चूक ठरेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये नोकरीच्या समस्या निर्माण होत आहेत आणि भविष्यात होणार आहेत. आज आपल्या क्षेत्रात टिकायचं असेल तर काही वर्षांपूर्वी घेतलेले शिक्षण पुरेसे ठरत नाही, तर त्यात झालेले आधुनिक बदल आपणालाही शिकावे लागतील, त्यातील कौशल्ये विकसित करावी लागतील. ज्या तंत्रज्ञानाने आपले महत्त्व कमी केले आहे ते तंत्रज्ञान आपणाला शिकून घ्यावे लागेल, तरच आपण कोणत्याही क्षेत्रात टिकणार आहोत.आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग सारख्या विषयांमध्ये आपण एकदम तरबेज झालो तरी त्याचा अर्थ असा नव्हे, की आपणाला आता वेगळे काही करायला नको. खरंतर याही तंत्रज्ञानाचा एक विशिष्ट काळ असणार आहे. लवकरच यापेक्षा नवीन काहीतरी तंत्रज्ञान येणार आहे. त्यामुळे सतत आपणास नवीन शिक्षणामध्ये गुंतून राहावे लागणार आहे. नवनवीन कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. आपले बहुआयामी व्यक्तिमत्व घडवावे लागणार आहे. म्हणूनच आपण आज न्यू एज्युकेशन पॉलिसी स्वीकारत आहोत. बदलांना सामोरे जाताना जर आपणास टिकायचं असेल तर शिकायलाच हवं. त्याला दुसरा कोणताही पर्याय असणार नाही.
कोणत्याही शाखांच्या अभ्यासात कोडिंग, डेटा सायन्स आणि AI सारखे विषय अविभाज्य भाग बनले आहेत, जे आजच्या नोकरीच्या बाजारपेठेत आवश्यक ठरतात. आज सतत शिकणे आणि कौशल्य विकास आवश्यक झाले आहे, कारण आज आपण जे ज्ञान मिळवतो ते उद्या कालबाह्य होऊ शकते. AI चा व्यापक प्रभाव लक्षात घेता, प्रत्येकाने त्याची तत्त्वे आणि त्याच्या वापराची मूलभूत समज विकसित करणे अत्यावश्यक आहे. हे ज्ञान व्यक्तींना AI साधनांचा प्रभावीपणे लाभ घेण्यास, त्यांच्या संबंधित क्षेत्रात नाविन्य आणण्यासाठी आणि स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारपेठेत पुढे राहण्यासाठी सक्षम करू शकते. आरोग्यसेवा, वित्त आणि अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांसह AI ला जोडणारे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन नावीन्यपूर्ण आणि करिअरच्या संधींसाठी नवीन मार्ग तयार करत आहेत.
तंत्रज्ञान आणि ज्ञान अत्यंत वेगाने विकसित होत आहे, नवीनतम घडामोडींशी जुळवून घेण्यात अयशस्वी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जे आपली कौशल्ये अद्ययावत करत नाहीत त्यांना नोकरी विस्थापन आणि रोजगारक्षमता कमी होण्याचा धोका निर्माण होणार आहे. एकेकाळी सुरक्षित वाटणाऱ्या नोकऱ्या आता AI मुळे असुरक्षित वाटू लागल्या आहेत. सतत शिकणे आणि जुळवून घेतल्याशिवाय भविष्यात आपण टिकू शकणार नाही हे सत्य आहे.
AI समजून घेणे आणि शिकणे हा केवळ एक पर्याय नाही तर वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी आवश्यक आहे. सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या वृत्तीमुळे आपण अनेक समस्यांना तोंड देऊ शकतो. आपण आज केवळ कौशल्य मिळवून चालणार नाही, तर ती सतत अद्यावतही केली पाहिजेत. तरच आपण जगाच्या बाजारात टिकून राहणार आहोत. आपण जर आपापल्या क्षेत्रात माहितीपूर्ण आणि कुशल असलो तर आपणास नोकरीचे समाधानही मिळेल आणि आपण आपली प्रगती ही करू शकू. आपण सक्रियपणे शिकत राहिलो आपली कौशल्ये विकसित करत राहिलो तर नवनवीन तंत्रज्ञानाला आपण आत्मविश्वासाने स्वीकारू शकतो आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहू शकतो.
अद्ययावत राहून आणि सतत शिकत राहून, आपण AI चे वर्चस्व असलेल्या जगाच्या आव्हानांना तोंड देऊ शकतो, त्याच्या क्षमतेचा उपयोग करू शकतो आणि एक समृद्ध भविष्य सुरक्षित करू शकतो. त्यामुळे भविष्यात आपणाला टिकायचं असेल तर आज शिकावच लागेल.
अत्यंत सुंदर लेख..आजच्या जगात किंबहुना येणाऱ्या काळात आधुनिक शिक्षण तंत्रज्ञान किती महत्वाचे आहे ,याबद्दल कमी शब्दात पण महत्वपुर्ण माहिती आपण या लेखातून दिली.आजच्या विद्यार्थ्यांनी येणा-या काळात कीती जागरूक आणि अपडेट असावं ते सांगून काळाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची गरज काय आहे त्याची जाणीव करून दिलीत... त्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद सर!
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवानवीन तंत्रज्ञानामुळे प्रस्थापित व्यवसाय, उद्योग अडचणीत येतात. पण, नवीन संधी उपलब्ध होते. त्यासंदर्भातील अनेक व्यवसाय निर्माण होतात.
उत्तर द्याहटवाAI शिकून नवीन संधी शोधायला हवी. त्यसाठी आपण म्हणता तसे, टिकायचे असेल तर नवीन शिकायलाच हवे.
नवीन संधी मध्ये प्रॉम्प्ट इंजीनियरिंग हा एक चांगला पर्याय आहे. धन्यवाद🙏
हटवाThoughtful article.
उत्तर द्याहटवाThanks Dear🙏
हटवाAI चे फायदे काय आहेत आणि तोटे काय हे देखील सांगा....
उत्तर द्याहटवानक्कीच, आपण सुचविल्याप्रमाणे AI वर आणखीही लेखन केले जाईल. धन्यवाद 🙏
हटवाहा ब्लॉग तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलत असलेल्या जगाचा सारांश उत्कृष्टपणे मांडतो आणि सातत्याने शिकण्याची आणि कौशल्य विकसीत करण्याची महत्त्वता अधोरेखित करतो. विविध क्षेत्रांमध्ये एआय कशा प्रकारे क्रांती घडवत आहे याचे तपशीलवार स्पष्टीकरण आणि या बदलांना सामोरे जाण्याच्या आवश्यकतेवर दिलेला भर प्रेरणादायी आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून व्यक्तीगत आणि व्यावसायिक वाढीसाठी अत्यावश्यक आहे हे या ब्लॉगमधून ठळकपणे समजते. तुम्ही दिलेला विचारशील आणि दूरदर्शी दृष्टिकोन खरोखर प्रशंसनीय आहे. उत्कृष्ट लेखनासाठी मनापासून अभिनंदन!
उत्तर द्याहटवाभूषणजी, आपण उत्तम मूल्यमापन केले आहे. आपल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद 🙏
हटवाखूप छान लेख! तंत्रज्ञानाच्या या विकासाचं वर्णन वाचून खूप आनंद आलं. या विषयावर आपल्या ब्लॉगमध्ये अजून सविस्तर माहिती मिळवून खूप मोठं लाभ होईल.
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम, AI वर आणखी एक ब्लॉग लिहिण्याचा मानस आहे. आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
हटवाआपली पोस्ट अत्यंत समर्पक आणि सखोल विचारांची आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलत्या जगात टिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी सातत्याने शिक्षण आणि कौशल्यांचा विकास किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्टपणे सांगितले आहे.
उत्तर द्याहटवाआर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संभाव्य प्रभावांवर दिलेली माहिती विचार करायला लावणारी आहे.
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करूनच आपण भविष्यातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतो, हा संदेश प्रेरणादायी आहे.
उत्तम लेखनासाठी धन्यवाद!
आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद 🙏
हटवाVery nice and informative.
उत्तर द्याहटवाThanks 🙏
हटवाशिकेल तोच टिकेल,समय के साथ चालू या उक्तीप्रमाणे शिक्षणातील नवनवीन बदल आणि बदलते तंत्रज्ञान आपण आत्मसात केले नाही तर आपण मागे पडणार हे नक्की .
उत्तर द्याहटवाअत्यंत वैचारिक टिप्पणी करणार लेख .
सारंग ठाणेकर.
आपली टिप्पणी नेहमीच प्रोत्साहनात्मक असते. खूप खूप धन्यवाद 🙏
हटवाखरंच भविष्य काळ खूप कठीण असणार आहे.
उत्तर द्याहटवा👍👍
हटवा
उत्तर द्याहटवाGood evening Doctor,
Today I have read your blog article and found very informative for all peoples. Now a days we are wasting our lot of time for watching u tube videos and whatsapp. As you told in your article that education is most important to achieve goals in our life. Age is no bar for us and it is true . I have experienced about it. At the age of 57 I have completed my post graduation in industrial safety with first class distinction. Really education is playing a very vital role in your success life and every one must be curious.
If you want to succeed in your life, please go for higher education. So that you can achieve skills and knowledge a lot. You can experienced in your life.
Once again thank you very much for your written article in your blog.
Thanks and regards,
Uday Anant Malgaonkar
Sr.Manager Maintenance
Tata Motors Ltd Pune Maharashtra
Mobile no 9552507823
Thanks for your detailed review. 🙏🙏
हटवाछान
उत्तर द्याहटवा👍👍
हटवाआपला "टीकायचं असेल तर शिकायलाच हवं "हा लेख खरंच प्रेरणादायी आहे. त्याच दुसरं रूप "जो शिकेल तोच टिकेल "हाही आहे. सध्या शिक्षणात प्रचंड प्रमाणात अमूलग्र बदल झालेले असताना त्या स्पर्धेत प्रत्येकाला टिकून राहायचे असेल तर ते शिक्षण आत्मसात करायलाच हवे..... आपले उत्तम मार्गदर्शन.. धन्यवाद 👍🏻
उत्तर द्याहटवाटिकायचं तर शिकायचं या AI आधारित ब्लॉगसाठी फीडबॅक...
उत्तर द्याहटवासर्वप्रथम, ब्लॉगचा विषय अत्यंत आकर्षक आहे. AI चा वापर आणि त्याचे शिक्षण क्षेत्रातील प्रभाव यावर चर्चा करणे वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तुम्ही AI च्या विविध उपयोगांवर विचार केला आहे, जसे की शिक्षणात वैयक्तिकृत अनुभव आणि शिकण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा. यामुळे वाचकांना AI चा वापर कसा केला जाऊ शकतो हे समजून घेण्यात मदत होईल.
तुमच्या लेखनशैलीत थोडी अधिक स्पष्टता दिल्यामुळे वाचकांना माहिती समजून घेण्यात मदत होईल.
सर, तुम्ही AI च्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती आणि महत्त्व थोडक्याच शब्दात मांडले पण ते समजण्यास उपयुक्त आहे. हे वाचकांना अधिक माहितीपूर्ण ठरू शकते.
तुमच्या ब्लॉगमध्ये वाचकांना आपल्या पुढील भविष्याबद्दल अथवा शिक्षणाबद्दल विचार करण्यास किंवा त्यांचे अनुभव शेअर करण्यास प्रोत्साहित करते. उदाहरणार्थ, "तुम्ही AI चा वापर कसा केला आहे?" किंवा "तुमच्या मते, AI शिक्षणात कसे बदल घडवू शकते?" असे प्रश्न वाचकांना विचार करण्यास भाग पाडेल.
सर, खूप उत्कृष्ठ प्रकारे तुम्ही तुमचे AI बद्दल शिक्षणाबद्दल मत स्पष्ट केला आहात.
THANK YOU..!!!
(B.Lib Stud - Vishakha K)