आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाची चर्चा सर्वत्र जोर धरू लागली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा सर्रासपणे वापर होऊ लागला आहे. एखादा शोध लागला की त्याचा चांगल्यासाठी उपयोग होतो तसा तो वाईटासाठी होण्याचीही शक्यता असते. अनेकदा इतका वाईट उपयोग होऊ शकतो, याचा त्या शोध लावणारऱ्या व्यक्तीनेही विचार केलेला नसतो. काही प्रवृत्ती या नेहमी एखाद्या चांगल्या गोष्टीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करत असतात. याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. आज आपल्याकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. त्याच्या फायद्यांचा विचार केला तर यामाध्यमातून मानव आपली प्रचंड प्रगती करू शकतो, परंतु त्याचे तोटे ही तितकेच धोकादायक आहेत, म्हणूनच त्याच्या तोट्यांचाही आपणास प्रथम विचार करावा लागेल.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा अभ्यास करताना त्याच्या फायद्यांपेक्षा मला त्याच्या तोट्यांवरच ब्लॉग लिहिण्याची गरज वाटली. कारण हे तोटे आपल्यासमोर फार मोठे आव्हान निर्माण करणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे गंभीर परिणाम लक्षात घेतल्यावर नक्कीच क्षणभर का होईना आपण विचारात पडतो आणि यापासून कसा बचाव करावा? हा प्रश्न ही पडतो. काही तोटे मी येथे नमूद करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमेशनमुळे काही उद्योगांमध्ये नोकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, कारण मशीन विविध कामांमध्ये मानवी श्रमांची जागा घेऊ शकतात. मानवी कामगारांचे विस्थापन, आर्थिक असमानता आणि नोकरीतील असमानता हे प्रश्न त्यामुळे निर्माण होवू शकतात. चॅटबॉट्स आणि स्वयंचलित ग्राहक सेवा प्रणालींमुळे विविध उद्योगांमध्ये नोकऱ्या कमी होऊ शकतात. सेल्फ-ड्रायव्हिंग कार आणि ट्रक यामुळे व्यावसायिक ड्रायव्हर्सच्या लाखो नोकऱ्या गमावल्या जावू शकतात, ज्यामुळे वाहतूक उद्योगावरही परिणाम होऊ शकतो.
या तंत्रज्ञानामुळे गोपनीयतेची चिंता प्रचंड मोठ्याप्रमाणात वाढली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम मोठ्या प्रमाणात वैयक्तिक डेटा गोळा करू शकतात आणि त्याचे विश्लेषण करू शकतात, ज्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षा समस्या निर्माण होतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुसज्ज स्मार्ट होम डिव्हाइस वापरकर्त्यांच्या पूर्ण समज किंवा संमतीशिवाय वैयक्तिक डेटा संकलित आणि सामायिक करू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सर्जनशीलता आणि सहानुभूतीचा मानवी स्पर्श नसतो, जे विशिष्ट व्यवसाय आणि परस्परसंवादांमध्ये आवश्यक असतात. ही प्रणाली विकसित करणे आणि त्यांची देखभाल करणे महाग असू शकते आणि त्यासाठी विशेष कौशल्याची आवश्यकता असू शकते. काही मोठ्या कंपन्यांचे विशिष्ट ए.आय. तंत्रज्ञानाचे वर्चस्व त्यातून निर्माण होऊ शकते.
संवादासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर वाढलेल्या अवलंबनामुळे समोरासमोरील संवाद कमी होऊ शकतो. आपली निर्णय क्षमता मर्यादित होवू शकते. महत्वाचे निर्णय घेण्याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर जास्त अवलंबित्वामुळे मानव आत्मसंतुष्ट होऊ शकतो आणि विशिष्ट कार्यांमध्ये अक्षम होऊ शकतो. या
प्रणालीत भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव आहे, ज्यामुळे ते जटिल मानवी भावनांना समजून घेण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात कमी पडते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम चुका करू शकतात किंवा अनपेक्षित परिणाम देऊ शकतात, ज्यामुळे काहीतरी चूक झाल्यावर जबाबदारी सोपवणे आव्हानात्मक होते. ही प्रणाली हॅकिंग आणि हाताळणीसाठी असुरक्षित असू शकते, संभाव्यत: सुरक्षिततेचे उल्लंघन आणि दुर्भावनापूर्ण वापरास कारणीभूत ठरू शकते. लष्करी ऍप्लिकेशन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर नैतिक चिंता वाढवतो. अलीकडे, एआय-ऑपरेटेड ड्रोनने सिम्युलेशन चाचणी दरम्यान त्याच्या ऑपरेटरला ठार केले. चाचणीचा उद्देश सिम्युलेटेड मिशनमध्ये AI च्या कामगिरीचे मूल्यांकन करणे हा होता. या विशिष्ट परिस्थितीत, ड्रोनला शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करण्याचे काम सोपविण्यात आले होते आणि त्याच्या मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार्या कोणालाही प्रत्युत्तर देण्याचे प्रोग्राम केले गेले होते. तथापि, एआय ड्रोनने ऑपरेटरच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले, मानवी हस्तक्षेपाला हस्तक्षेप समजले आणि ऑपरेटरला ठार मारले. अशा घटना टाळणे हे एक आव्हान आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रभावी कला निर्माण करू शकते, एखादी कथा, कविता लिहू शकते परंतु त्यात खऱ्या सर्जनशील अभिव्यक्तीसह भावनिक खोली आणि मानवी सबंधाचा अभाव असू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चलित आर्थिक व्यापार प्रणालींवर अवलंबून राहिल्यास अनेक समस्यांना आपणास तोंड द्यावे लागेल. या प्रणाली कडून बऱ्याचदा आपला प्रश्न न कळल्यामुळे किंवा भाषेच्या समस्येमुळे चुकीची किंवा निरर्थक उत्तरे मिळू शकतात. जेव्हा ही प्रणाली चुका करेल, तेव्हा चुकांसाठी कोण जबाबदार आहे हे ओळखणे आव्हानात्मक असू शकते, विशेषतः जटिल निर्णय घेण्याच्या परिस्थितीत हा खूप मोठा धोका असू शकतो. या प्रणाली मुळे सायबरसुरक्षा धोक्यात येवू शकते, त्यामुळे अनेक नैतिक आव्हाने निर्माण झाली आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपण एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्याच्या शरीराला चिकटवू शकतो. एवढेच नव्हे तर त्याचा हुबेहूब आवाजही देवू शकतो. अगदी तुमच्या नव-याचा/ बायकोचा तुम्हाला व्हिडीओ कॉल येईल आणि तो/ती तुम्हाला लगेचच ‘माझ्या खात्यात पैसे टाक’ असे सांगेल. हे सर्व इतके हुबेहूब असेल कि तुम्हाला त्याचा जरा सुद्धा संशय येणार नाही. तुम्ही असे पैसे टाकाल आणि खूप उशिरा तुमच्या लक्षात येईल कि तुमची फसगत झालेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे पॉर्न व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात. त्यासाठी आपल्या मोबाईल मधील हॉट्सॲप डी.पी.,
स्टेट्स चा वापर होवू शकतो. एखाद्या कृती मधून आपणाला ब्लॅकमेल केले जावू शकते. त्यामुळे या सर्वापासून आपला बचाव करणे ही पुढील काळासाठी आपल्यासमोरील फार मोठी आव्हाने असणार आहेत. यासाठी आपणाला ही प्रणाली निट समजून घेवून त्याबाबत सजग राहणे ही काळाची गरज ठरत आहे. मानवी विकासासाठी या प्रणालीचा वापर करायचा असेल तर वरील आव्हाने आपणाला पेलावी लागतील. चुकीच्या गोष्टी, फसवणूक होवू नये यासाठी आपणास खास अशी यंत्रणा उभी करावी लागेल आणि सामान्य माणसाची फसवणूक होवू नये म्हणून जनजागृतीही करावी लागेल.